महाराष्ट्राची ओळख
महाराष्ट्राला “ महाराष्ट्र “ हे नाव कसे पडले ?
महाराष्ट्र याच शब्दात याचा महत्पूर्ण अर्थ दडलेला आहे.
महा ( Great ) , राष्ट्र ( Region ) , महाराष्ट्र ( Great Region).
आज बहुतांश लोकांना माहीतच नाही की महाराष्ट्र हे नाव कसे पडले, या भूभागात सुमारे ८ व्या शतकापासून आजपर्यंत काय घडले या सर्वांची माहिती आपल्याला Untold Maharashtra वर मिळणार आहे.
भाताच्या पश्चिम-दक्षिणेकडील कोपर्यात वसलेला महाराष्ट्र केवळ एक भौगोलिक प्रदेश नसून एक विचार, संस्कृति , अणि संघर्षाचा अनन्य प्रवास आहे.
पश्चिम दिशेला सह्याद्री तसेच पूर्वेला हिरवीगार मैदाने-या दोन टोकामध्ये पसरलेले डेक्कन पठार म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्रच्या या भूमिवर “चालुक्य , राष्ट्रकूट, यादव, बहामनी , निजामशाही, मराठा, पेशवे, ब्रिटिश अशा अनेक सत्तांचा प्रभाव पडला. प्रत्येकाने या भूमिला काहीतरी नवीन दिले, काही जखमा केल्या, पण त्यातून महाराष्ट्राने नेहमीच स्वतःच वैशिष्ट्य टिकवून ठेवल.
महाराष्ट्राच्या या पावन भूमिमध्ये समाजसुधारक, योद्धे, संत, कवि, विचारवंत यांची पीढ़ी निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमिला स्वप्नं दाखवून अस्तित्वात आणली. पेशव्यांनी ते वैभव अधिक विस्ताराल.
१८ व्या-१९ व्या शतकात महाराष्ट्राने ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभारला. यामधे लोकहितवादी महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांसारख्या विचारवंतांनी समाजजागृतीचा नवा युगआरंभ केला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाने मराठी भाषेला नवी ओळख दिली, अणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली.
आजचा महाराष्ट्र म्हणजे परंपरा अणि आधुनिकता यांचा सुंदर असा संगम. मुंबईचे अंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र, पुण्याचे शैक्षणिक वैभव, कोकणातील निरामय निसर्गसंपदा , विदर्भातील शेती अणि ऊर्जा, मराठवाड्यातील एतिहासिक वास्तु-याच सर्वानी महाराष्ट्राला खरी ओळख दिली आहे.
